मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

आता सीमकार्ड खरेदीसाठी आधारची सक्ती नाही

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.2 : सरकारने ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत खुशखबर आणली आहे. आता कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड खरेदी करताना आधारकार्ड देणे बंधनकार नसल्याचे परिपत्रक दूरसंचार विभागाने काढले आहे. आधारकार्डाऐवजी पर्यायी ओळखपत्रे उदा. वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इ. घ्यावे असेही त्यात सांगितले आहे.ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सीमकार्ड कंपन्यांना या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी करण्याचे आदेश दूरसंचार विभागाच्या सचिव अरूणा सुंदरराजन यांनी दिले आहेत.

यापूर्वी कोणतेही सीमकार्ड घेताना आधारकार्ड देणे बंधनकारक होते. आधारकार्डशिवाय कोणालाही सीमकार्ड खरेदी करता येणार नाही अशी भूमिका सर्व टेलिकॉम कंपन्यांनी घेतली होती. पण यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्डाचे कोणतेही बंधन नसल्याचा निर्णय दिला होता. पण सीमकार्ड कंपन्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती, म्हणून दूरसंचार विभागाने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व कंपन्यांना दिला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आधार सक्तीमुळे टेलिकॉम कंपन्या आधारकार्ड घेऊन व्हेरीफिकेशन (पडताळणी) करत होत्या, पण परदेशी नागरिक, अनिवासी भारतीयांना काही कालावधीसाठी सीमकार्ड घेण्यची गरज लागत असल्याने, केवळ आधारसक्तीमुळे ते खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे सरकारने गंभीरपणे दखल घेत यावर तोडगा काढला आहे.

Share