पत्रकार महेश तिवारी वरुणराज भिडे पुरस्काराने सन्मानित

0
9

सिरोंचा,दि.2(अशोक दुर्गम) : अतिदुर्गम नक्षल प्रभावित भाग म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार महेश तिवारी यांना शिक्षणाचे माहेरघर पुणे येथे मानाचा समजला जाणाऱ्या स्वर्गीय वरुणराज भिडे पुरस्काराने सनमानित करण्यात आले. गडचिरोली सारख्या मागासलेल्या ठिकाणी पण राज्यस्तरावर नावाजलेले पत्रकार असल्याचे पुरस्कार प्राप्त महेश तिवारी यांनी सिध्द केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संन्मेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश तिवारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराने सन्मानित होऊन महेश तिवारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेपणा तसेच माओवाद या विषयावर अभ्यासपुर्ण मनोगत व्यक्त केले होते.