मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी# #कोंबडपार जंगलातील चकमकीत एक नक्षली ठार

नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम,ओबीसी मुलीमध्ये श्रुती कानडे प्रथम

पुणे,दि.03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.
महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत खुल्या गटाचा कट आॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागास वर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे, असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी सांगितले. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) डोंबिवलीतील श्रुती कानडे हिने राज्यात मुलींमध्ये (ओबीसी) प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील मेघदूत इमारतीत राहणाऱ्या श्रुतीचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर शाळेत झाले. तिने एमएससी बायोटेकचे शिक्षण मुलुंडमधील केळकर-वझे महाविद्यालयात घेतले. विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तिने कुठेही क्लास लावला नाही. तिला घरातूनच प्रोत्साहन मिळाले. श्री गणेश मंदिर संस्थानच्या लायब्ररीत बसून तिने अभ्यास केला. चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची आहे. अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळते, असा संदेश श्रुतीने दिला आहे.तिचे वडील मनोहर हे पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत, तर भाऊ श्रीकृष्ण हा पोलीस खात्यातच कमांडोपदावर आहे. आई मीनल गृहिणी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.

Share