मुख्य बातम्या:

विधान परिषदेसाठी भाजपाकडून डॉ. आंबटकर यांचे नामांकन दाखल

चंद्रपूर दि. 3- चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून आज ३ मे रोजी डॉ. रामदास आंबटकर यांनी  उमेदवारी अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, खा. रामदास तडस, आ. प्रा. अनिल सोले, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र  कोठेकर, चंदनसिंह चंदेल,  अंजलीताई घोटेकर, संजय धोटे, आ. बंटी भांगडिया, आ. पंकज भोयर, आ. समीर कुनावार, आ. कृष्णा गजबे, आ. गिरीश व्यास, देवराव भोंगळे, राजेश बकाने, संजय गजपुरे, हरीश शर्मा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share