मुख्य बातम्या:

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

देवरी,दि.03- राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर खुर्शिपार नजीक एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला जबरदस्त धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर असे की, देवरी पासून पाच-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुर्शिपार नजीक राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला धडक दिली. परिणामी, सदर हरीण जागीच गतप्राण  झाले. प्रत्यक्षदर्शींनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहीती दिल्यावर संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सोशिअल मिडीयावरून सदर घटनेचे फोटो प्रसारित झाल्यावर वनकर्मचारी खडबडून जागे झाले.
Share