मुख्य बातम्या:
काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा# #लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात# #ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार# #वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार# #पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा# #स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन# #कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे# #युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल# #ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी# #आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

कंत्राटी बाजार वसुली रद्द करा मुख्याधिकार्याला निवेदन

गोंदिया ,दि.३ : नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली होती. ते आपल्या मागणीवर ठाम असून गुरूवारी (दि.३) कॉँग्रेस सदस्य व सावित्रीबाई फुले चिल्लर भाजी विक्रेता संघाच्यावतीने मुख्याधिकारी चंदन पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.शिष्टमंडळात नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, नगरसेवक सुनील भालेराव, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, निर्मला मिश्रा, दिपीका रूसे, श्वेता पुरोहीत, सावीत्रीबाई फुले भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे, राजू नागरीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख व भाजी विक्रेता संघाचे मुकेश शिवहरे उपस्थित होते.
नगराध्यक्षांच्या एका घोषणेमुळे नगर परिषदेच्या बाजार वसुलीवर गाज पडली. सुमारे ७ लाख रूपये वार्षीक उत्पन्न असलेली बाजार वसुली नगर परिषदेला बंद करावी लागली. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या उत्पन्नाच्या दुसºया पर्यायाची व्यवस्था असावी असे नगर परिषद अधिनियमात नोंद आहे. त्यामुळे नगर परिषदेला बाजार वसुली कंत्राटी पद्धतीवर देण्याचे सुचले. त्यानुसार, नगर परिषदेने निविदा काढून इ-लिलाव केला. त्यात येथीलच एका कंत्राटदारास १६ लाख ५५ हजारांत बाजार वसुलीचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटादाराने वसुली सुरू केली आहे.
कंत्राटी तत्वावर बाजार वसुलीच्या या प्रकाराला नगर परिषदेतील विरोधी पक्षातील कॉंग्रेस पक्षाचा सुरूवातीपासूनच विरोध होता. यावर त्यांनी जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन देऊन कंत्राटी बाजार वसुलीचा हा प्रकार रद्द करण्याची मागणीही केली होती. एवढेच नव्हे तर स्थायी समितीच्या सभेतही विरोध केला होता. मात्र संख्याबळाच्या आधारावर ते कमी पडले व नगर परषदेने कंत्राटी बाजार वसुली सुरू केली.

Share