मुख्य बातम्या:

भाजपच्या नाराज कार्यकत्र्यांच्या घरी पोचणार नेते

गोंदिया,दि.०३ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय हालचालींना वेग आले आहे.सरकारच्या धोरणामूळे भाजपचेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज चालले आहेत.ज्यांनी काँग्रेसच्या काळात चांगली कंत्राटदारी करुन कुटुंबाचे भरणपोषण केले,तेच कार्यकर्ते मात्र पक्षाची सत्ता आल्यावर बेहाल झाले.त्यातच अनेक चुकीच्या धोरणामूळे आणि जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्याप्रमाणात कार्यकत्र्यामध्ये नाराजी सुरु आहे.ही नाराजी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊ नये यासाठी उद्या शुक्रवारला गोंदिया शहरातील काही नाराज चाललेल्या कार्यकत्र्यांच्या घरी गोंदियाचे पालकमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री जाऊन त्या कार्यकत्र्यांची समजूत घालून त्यांच्या घरचे जेवणाचा स्वादही घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.विशेष म्हणजे या दरम्यान विशेष जातीप्रवर्गाची बैठक घेऊन त्यांना आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न सुध्दा होणार असल्याचे एका पत्रकावरुन बघावयास मिळाले आहे.

Share