रापेवाड्याचे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित-मुकेश शिवहरे

0
36

गोंदिया,दि.०३-शेतकèयांच्या संपानंतर दबाव वाढल्यामुळे राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. त्याचा मोठा गाजावाजा केला गेला.मात्र ऑनलाईन अर्ज भरून घेतलेल्या शेतकèयांपैकी ४० टक्के अर्ज छाननी अंती बाद झाल्याचे समोर आले.त्यातही गोंदिया तालुक्यातील रापेवाडा या गावातील एकाही शेतकèयाला या कर्जमाफीचा लाभच मिळाला नसल्याने ही कर्जमाफीच फसवी निघाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी केला आहे.शिवहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० ते १५ दिवसापासून आपण सातत्याने गोंदिया तालुक्यातील गावामध्ये सकाळच्या सुमारास जाऊन कर्जमाफी,उज्वला गॅस योजनेसह विविध योजनांची माहिती घेत असताना रापेवाडा या गावातील एकाही शेतकèयाला आजच्या तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभच मिळाला नसल्याचे सांगितले.गावातील प्रत्येक शेतकèयाने आपल्याकडे यासंदर्भात तक्रार केली असून भाजपचे सरकार व मंत्री हे कर्जमाफीचा लाभ शेतकèयांना मिळाल्याचे जे सांगत आहेत ते फसवे असल्याचे सांगितले.सोबतच जवळील चुटीया गावात २५० लाभार्थी हे उज्वला गॅसकरीता पात्र असताना आजपर्यंत फक्त ५० च्याजवळपास लाभाथ्र्यांना या योजनेला लाभ मिळालेला आहे.तर दुष्काळामुळे सोनबिहरी,परसवाडा,रतनारा,डोंगरगाव,खर्रा,पांगडी,मुरदाळ आदी भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.त्यातच रोजगाराचे साधन सरकारने अद्यापही उपलब्ध करुन दिले नसून बँकानी अद्यापही कर्जमाफीचे प्रकरण न हाताळल्याने शेतकèयाची फसवणूक झाली असून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने गाजावाजा केलेली कर्जमाफी योजना गोंदिया जिल्ह्यात मात्र फसल्याची टिका शिवहरे यांनी केली आहे.कर्जमाफीच्या जोरदार घोषणा होऊनही अद्याप प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नसल्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोषाचे वारे आहे. त्यात काही शेतक-यांना कर्जमाफी झाली आणि काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले तर हा संताप आणखी वाढू शकतो. आपल्या बाजूच्या माणसाला एखादा लाभ मिळाला आणि आपलाही तोच हक्क असताना तो जर मिळाला नाही, तर निराशा तीव्र होते. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या अशाच निराशेतून केली होती. आताही जर काही शेतक-यांना कर्ज मिळाले आणि काहींना मिळाले नाही, तर त्यातून निराशेची भावना वाढीस लागून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या काळातच असा पक्षापातीपणा झाला तर त्याच्या परिणामाला सामोरे जाण्याची तयारी भाजपला ठेवावी लागेल.