मूळनिवासी नेत्यांवर अविश्वास;गोंदिया-भंडारा जिल्ह्यावर नागपूरी नेत्यांचा कब्जा

0
39

गोंदिया,दि.०३ः-पुर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया या दोन्हा जिल्हयांचे राजकारण-समाजकारण एकमेकावर जरी अवलबूंन असले तरी या जिल्ह्याच्या राजकीय आढावा घेतल्यास भारतीय जनता पक्षाने या दोन्ही जिल्ह्यावर नागपूरातील नेत्यांचे नियंत्रणच नव्हे तर वर्चस्व ठेवल्याने या दोन्ही जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या नेत्यांना नागपूरी आकाच्या आदेशावरच नतमस्तक होण्याची वेळ आली आहे.या दोन्ही जिल्ह्यातील बहुजन राजकारणाला संपविण्यासाठी भाजपने खेळलेल्या राजकारणात या जिल्ह्यातील बहुजन समाजातील भाजपचे नेते हळूहळू संपुष्टात येऊ लागले आहेत.नागपूरातील रहिवासी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याला आपल्या सोयीच्या राजकारणासाठी प्रयोगशाळाच बनविल्याचे चित्र दिसून येत आहे.गडकरी फडणवीस जे म्हणतील तेच या जिल्ह्याचे राजकारण अशी परिस्थीती झाली असून आता तर येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीचा विचार केल्यास गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे मूळ असलेले व गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर पक्षाचा अविश्वासच म्हणावा की काय या पोटनिवडणुकीची पुर्ण धुरा मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले पण नागपूर व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.बावनकुळेंच्या सोबतीला आदरणीय बडोले साहेबांना ठेवल्याचे त्यांच्याच पक्षातील काही कार्यकत्र्यांचे म्हणने असल्याने बडोलेवर गडकरी व फडणवीसांचा विश्वास नाही असे म्हणावे काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.वास्तविक नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर या पोटनिवडणुकीची धुराच राजकुमार बडोलेंच्या हाती द्यायला हवे होते.कारण ज्यापध्दतीने पटोलेना रोखण्यासाठी गडकरी व फडणवीसांनी बडोलेंना राज्यात मंत्रीपद ज्या आत्मविश्वासाने दिले.त्याच आत्मविश्वासाने पोटनिवडणुकीची धुरा बडोलेंवर न सोपविता बावनकुळेंच्या हाती सुत्रे देणे म्हणजे बडोलेपेक्षा बावनकुळे हे परिपक्व राजकारणी आहेत हा दाखविण्याचा खटाटोप तर भाजपने केला नाही ना अशा चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीला नेहमीच दोषारोपण देत टिका करणारी भाजप मात्र या दोन्ही जिल्ह्यावर नागपूरातील नेते थोपवित असल्याचे का विसरते हे कळायला मार्ग नाही.एकतर या दोन्ही जिल्ह्यात भाजपच्या दृष्टीने विधानपरिषदेसाठी पाहिजे तसे उमेदवार नाहीत हा हे स्पष्ट होते.जर विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ असो,पदविधर असो की भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज संस्थेचा आमदारासाठी या दोन्ही जिल्ह्यात लायकीचा उमेदवार नसल्यामुळेच नागपूरचे उमेदवार दिले गेले असतील तर भाजपने आमदार परिणय फुके व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कुणा एकालाच वास्तविक लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यास qजकण्याची हमखास खात्री राहील.स्थानिक स्वराज्य संस्थेत नागपूरचे परिणय फुके,पदविधर मतदारसंघात डॉ.अनिल सोले,शिक्षक मतदारसंघात ना.गो.गाणार हे सर्व नागपूरचेच मग पोटनिवडणुकीत नागपूरचा उमेदवार दिल्यास काय हरकत अशी चर्चाही रंगू लागली आहे.त्यातच भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपच्या समन्वयाची धुरा ही नागपूरच्या नव्हे मात्र गोंदिया जिल्ह्यातील विरेंद्र अंजनकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अंजनकर हे संघाच्या तालमीत वाढलेले असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असली तरी त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे आणि पक्षासाठी नियमित काम करणारे पदाधिकारी या दोन्ही जिल्ह्यात असतानाही त्यांना डावलण्यात आले.यासर्व भाजपमधील राजकीय परिस्थितीकडे बघितल्यास नागपूरातील मंडळी या दोन्ही जिल्ह्यातील बहुजनसमाजाली नेत्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करुन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच या मतदारसंघाला प्रयोगशाळा बनवून ठेवले हे म्हटल्यास मात्र वावगे होणार नाही.