बुलढाणा जिल्ह्यातील 11 अवैध सावकारच्या प्रतिष्ठानावर धाडी

0
22

बुलढाणा,दि.04 : जिल्ह्यातील अवैध सावकारी प्रशासनाकडे प्राप्त तक्ररी वरून गुरुवारला जिल्हयातील चिखली, खामगांव, जळगाव जामोद, नांदुरा व शेगाव अश्या पाच तालुक्यातीळ 11 अवैध सावकारांच्या घरी आणि प्रतिष्ठानावर धाडी टाकण्यात आल्या. यात जिल्हा निबंधक कार्यालय, महसूल, आणि पोलीस प्रशासनाने सयुंक्तरित्या कारवाई केली आहे.या दरम्यान संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत.त्यामध्ये कोरे स्टैंप पेपर, खरेदी खत, बॉन्ड पेपर, कर्जदार नोंदवही अशी महत्वाची कागदपत्रांचा समावेश  असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकरी अवैद्य सावकारांच्या पाशात अडकलेले आहेत पठाणी वसुली मुळे अनेक ठिकाणी भांडण-तंटे यासारखे प्रकारही झालेले आहेत. याबाबतची गंभीर दखल घेत  गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून अवैध सावकारांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर धाडी टाकण्यात आल्या व पंचांसमक्ष संशयास्पद कागदपत्रे  जप्त केले.महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 16 नुसार हि  केली कार्रवाई  झाली असून या मोहिमेत 80 अधिकारी , कर्मचारी व पोलिसांचा सहभाग होता.