दुचाकीच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर

0
32

अर्जुनी मोरगावात टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

गोंदिया,दि.4 : दोन दुचाकीच्या आमोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना तिरोडा-तुमसर मार्गावरील नवेगाव शिवारात ३ एप्रिलच्या पहाटे घडली.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात टिप्परचालकाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचे दोन्ही पाय मोडल्याची घटना घडली.

२ एप्रिल रोजी मुंडीकोटा येथील गुरुदेव भांडारकर यांच्याा मुलीचा विवाह दांडेगाव येथील क्षीरसागर यांच्या मुलाशी व्यवस्थीत पार पडून लग्न कार्य आटोपून तुमसर जिल्हा भंडारा येथील वराचे आत्यभाऊ रोशन रविंद्र अहीरकर (१८) आपले वडील रविंद्र अहीरकर (४०) यांच्यासह होंडा आय स्मार्ट मोटारसायकल क्रं.एमएच ३६/डब्ल्यू-१०२७ ने तुमसरकडे ३ एप्रिलच्या पहाटे दीड वाजताच्या दरम्यान जात असताना देव्हाडीकडून खोपडा येथील १९ वर्षीय महेंद्र भीवा खोकले हा आपल्या आईस आणण्यास गेला होता. मात्र, मुलाने पार्टी केल्याने समजल्यावरून आईने येण्यास नकार दिल्याने महेंद्र एकटाच आपली हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रं.एमएच ३५/एके-२५७१ ने खोपडा येथे येत असताना नवेगाव शिवारात दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन रोशन याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील रविंद्र यांचा उजवा हात व डावा पाय तुटला असून डोक्याला जबर मार लागल्याने तसेच महेंद्र हाही गंभीर जखमी झाल्याने दोन्ही जखमींना तुमसर येथे उपचाराकरिता नेण्यात आले असून जखमी महेंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविंद्र अहिरकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तुमसर येथील रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रोशन याचे अपघाती मृत्यूमुळे त्याचे आतेभाऊ क्षीरसागर यांच्या लग्नाचा दांडेगाव येथे आयोजित स्वागत समारंभ रद्द करण्यात आला असून तिरोडा पोलिसांनी मोटारसायकल क्रमांक एमएच ३५/एके-२५७१ च्या चालकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.