नागरिकांनी नक्षल चळवळीपासून दूर रहावे-गायकवाड

0
18

सिरोंचा,दि.04(अशोक दुर्गम) – गावातील नागरिकांनी नक्षल चळवळीत जावू नये तसेच नक्षल्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले.उपपोलीस ठाणे दामरंचा तर्फे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक ए. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या नैनेर येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून गिल्ला गावडे, मासा मडावी (नैनेर), दस्सा वेलादी (मदगु), लच्चा आत्राम, विज्या गावडे (आशा), चिन्ना तलांडी (पालेकसा), मारोती कोटरामी (कापेवंचा) उपस्थित होते. मेळाव्यात पथनाट्य सादर करून नक्षलविरोधी प्रपोगंडा केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गावातील नागरिकांना नवीन २५ सायकली, १२ शिलाई मशीन, साड्या, शर्ट- पॅन्ट, धोतर, व्हॉलीबॉल व नेट, बॅट-बॉल, लेडीज ड्रेस, लहान मुलांना कपडे आशा प्रकारचे साहित्य वाटण्यात आले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी दामरंचा उप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल लवटे, ढरक , गणेश मोरे, व्यंकट गंगलवाड, आप्पासाहेब पडळकर, समाधान गायकवाड, अनिल चांदूरे, अभिजीत भोसले, वाचक फौजदार जिमलगट्टा धनंजय विटेकर,  विनायक सपाटे तसेच गंगाराम पार्टीचे ढरक  संदीप जाधव, गंगाराम सिडाम व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
यावेळी एसडीपीओ डॉ. गायकवाड यांनी विविध शासकिय योजनांची माहिती नागरिकांना दिली. गावातील समस्या जाणून घेतल्या. गावात हातपंप देण्याचे आश्वासन दिले. तसेच  ‘द्या माहिती, व्हा लखपती’ व आत्मसमर्पण योजनेबाबत माहिती सांगितली.या मेळाव्यात नैनेर, आशा, मदगु, पालेकसा व कापेवंचा या गावातील जवळ पास ४०० ते ५०० नागरिक उपस्थित होते.