पोटनिवडणुकांचा पराभव हा आमच्यासाठी राज्याचा विजय मिळवून देतो-बावनकुळे

0
13

गोंदिया,दि.०४ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या घोषणनेनंतर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी नेते राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदियात लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेतील प्रश्नत्तोराच्या दरम्यान आजपर्यंतच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आमचा पक्षाचा पराभव जरी झाला असला तरी आमच्या पक्षाला त्या तुलनेत पाच राज्यांचा विजय मिळाला आहे हे विसरता येणार नसल्याचे सांगितल्याने खळबळ माजली आहे.येथील एका खासगी हॉटेलात आयोजित पत्रकारपरिषदेत बावनकुळे यांनी ज्या माजी खासदारामुळे ही पोटनिवडणुक लागली त्यांनी निव्वळ आपल्या प्रसिध्दीसाठी प्रधानमंत्र्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यावंर आरोपाच्या फैèया झाडल्याची टिका केली.या पत्रपरिषदेला गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले,जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,आमदार संजय पुराम,माजी आमदार केशवराव मानकर,माजी.जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,विनोद अग्रवाल,जि.प.उपाध्यक्ष हामीद अल्ताफ शेख उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की नाना पटोले यांनी साडेतीन वर्षात कुठलाच विकासात्मक कामे मतदारसंघात केली नाही उलट प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यावर टिका करुन आपला कामचुकारपणा लपविण्याचा प्रयत्न केला.त्यांच्यामुळेच ही पोटनिवडणुक लागली असून जनता नक्कीच त्याचे उत्तर देईल.आमचा पक्ष ताकदीने यासाठी कामी लागला आहे.येत्या ९ मे रोजी पक्षाचा अधिकृत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे सांगतानाच उमेदवारांचे नाव मात्र जाहीर केले नाही.पक्षाकडे सहा ते सात जणांनी उमेदवारी मागितल्याचे सांगत त्यामध्ये माजी खासदार खुशाल बोपचे,शिशुपाल पटले,माजी आमदार हेमंत पटले,दादा टिचकुले,विरेंद्र जायस्वाल व प्रकाश मालगाये यांचा समावेश असल्याचेही म्हणाले.दरम्यान गोंदिया जिल्हयातील रापेवाडा गावातील शेतकèयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या मुद्यावर चौकशी करु तर वर्ग २ ची जमीन १ करण्यासाठी एसडीओ १५ प्रमाणपत्र मागत असल्याच्या प्रश्नावर असे होऊ शकत नाही लेखी तक्रार करावे असे सांगत बाजू झटकण्याचा प्रयत्न केला.गेल्या साडेतीनवर्षात जिल्ह्यात एकही विकासात्मक चांगले काम होऊ शकले नाही यावरही पाहिजे तसे समाधानकारक उत्तर न देता टोलवाटोलवी करण्यात आली.लोकसभा पोटनिवडणुक आम्ही qजकू यासाठी संघटन कामाला लागले असून कुणी व्यक्ती नव्हे तर पक्ष संघटनेचाच विजय असतो असे बावनकुळे म्हणाले.