भंडारा उपजिल्हाधिकारी निवडणूक पदी विलास ठाकरे रुजू

0
15
????????????????????????????????????

भंडारा एसडीओ प्रविण महिरे,अर्जुूनीमोर एसडीओ शिल्पा सोनोळे

गोरेगाव तहसिलदार हिंगे तर डहाट साकोलीचे
गोंदिषा, दि. 5 :भंडारा उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर विलास ठाकरे आज रुजू झाले आहेत. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे कडून उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदाचा कार्यभार स्विकारला. भंडारा-गोंदिया लोकसभेची पोट निवडणूक 28 मे 2018 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर विलास ठाकरे यांचे उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर नेमणूक करण्यात आली. या पूर्वी ते नागपूर जिल्हयातील काटोल येथे उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत होते.
या सोबतच उपविभागीय अधिकारी तुमसर शिल्पा सोनाले यांची बदली उपविभागीय अधिकारी अर्जूनी मोरगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी झाली आहे. नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी भंडारा रविंद्र राठोड यांची बदली चिमूर येथे झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गोंदिया येथील निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची बदली झाली आहे. तुमसर येथील उपविभागीय अधिकारी पदावर वर्धा येथील उपजिल्हाधिकारी रोहयो स्मिता पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
साकोली येथील तहसिलदार अरविंद हिंगे यांची बदली तहसिलदार गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे झाली आहे. त्यांच्या जागी गोरेगाव तहसिलदार कल्याण कुमार डहाट यांची बदली झाली आहे.