विहिरीचे खोदकाम करताना आढळला भुयारी मार्ग

0
14

यवतमाळ,दि.5 : विहिरीचे खोदकाम करताना भुयारसदृश्य मार्ग आढळल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील प्राचीन गाव असलेल्या केळापूर येथे उघडकीस आली. हा मार्ग पांढरकवडा येथील गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने याबाबत संशोधन करण्याची गरज निर्माण झाली.
केळापूर हे अतिप्राचीन व ऐतिहासिक गाव आहे. येथे जगदंबा मातेचे पुरातन मंदिर आहे. प्राचीन काळी कुंतलापूर नावाने केळापूर ओळखले जायचे. तसेच पांडव अज्ञातवासात असताना येथे आश्रयाला असल्याचे सांगितले जाते. केज राजाची राजधानी असलेल्या केळापूर येथून पांढरकवडाच्या गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत एक भूयारी मार्ग आणि वाई येथील चंडिका माता मंदिरापर्यंत दुसरा भुयारी मार्ग त्या काळी असल्याचा उल्लेख ‘वºहाडचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो.
केळापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम सुरू आहे. काही मजूर खोदकाम करताना त्यांना दोन आडवे मोठे खड्डे दिसले. त्यांनी पुन्हा खोदायला सुरुवात केली असता लांबपर्यंत आतमध्ये पूर्व भागाने भुयारसदृश्य जवळपास पाच फूट रुंदीचे खड्डे आढळून आले. ही माहिती गणेश अनमूलवार या तरुणाला मिळताच त्याने भुयारासारख्या दिसणाºया मार्गाने प्रवेश केला. आतमध्ये बºयाच लांबपर्यंत हा मार्ग आढळून आला. १० ते १५ फूट आत जावून समोर काळोख असल्याने व श्वास गुदमरल्याने तो परत आला. या प्रकाराची माहिती होताच अनेकांनी भेटी देऊन पाहणी केली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जगदंबा संस्थानचे माजी अध्यक्ष दीपक कापर्तीवार, डॉ.नीलेश परचाके, मदन जिड्डेवार, प्रेमराव वखरे, विजय पाटील आदींनी या स्थळाला भेट दिली.