घरकुल यादीतच केली चक्क खोडतोड;राका ग्रामपंचायतीचा अफलातून कारभार 

0
16
२०१७ मध्ये लग्न झालेल्यांची नावे २०१६ च्या यादीत
सडक अर्जुनी,दि.5 :   सर्वांना हक्काची घरे मिळावीत याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. मात्र, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ग्रामसभेत प्रोसिडींग तयार करून मंजूर करण्यात आलेल्या घरकुल यादीतच चक्क प्रोसिडींगवर खोडतोड करून पुन्हा नवे नावे लिहीण्यात आल्याचा अफलातून प्रकार तालुक्यातील राका पंचायतीत उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ओरिजिनल प्रोसिडींग खोडून ही ग्राम पंचायत पुन्हा नव्या वादाच्या भोवºयात सापडली आहे.
सविस्तर असे की, पंतप्रधान आवास योजना यादीत ज्या व्यक्तीचे नाव नसते अशा व्यक्तींसाठी शासन परिपत्रकानुसार  सन १५ आॅगस्ट २०१६ च्या सभेत  नवी यादी  बनविण्यात आली. यात जवळपास ४२६ लाभार्थ्यांचे नाव लिहिण्यात आले. आणि ती यादी तयार करून पंचायत समितीला पाठविण्यात आली. त्यानंतर आता २०१८ मध्ये  २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या यादीत खोडतोड करून  ग्राम पंचायतीमध्ये काम करणाºया तथाकथिक पदाधिकाºयांच्या घरातील व्यक्तींची नावे व अगदी जवळच्या व्यक्तींची नावे लिहून चक्क ओरिजिनल प्रोसिंडींग खोडून दुसºयांच्या नावावर सफेद शाही लावून आपल्या व्यक्तींची नावे चढविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचे लग्न २०१७ मध्ये झाले त्याच्या पत्नीचे नाव २०१६ च्या यादीत लिहीण्यात आले आहेत.
  अशी जवळपास २१ नावांमध्ये खोडतोड करून नवी नावे समाविष्ट करण्याचा प्रताप राका ग्राम पंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या यादीतील खोडतोडप्रकरणी  मधूकर ताणूजी मेंढे यांनी संबधितावर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती सडक अर्जुनी यांचेकडे  तक्रार केली आहे. मुख्य म्हणजे, मागील काही महिन्याअगोदर याच ग्राम पंचायतीने ओरिजिनल मस्टरला व्हाईटनर लाऊन चक्क ४५ बोगस नावे लपविण्यात आले होते. मात्र, याप्रकरणावर कोणीतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमकं पाणी कुठे मुरते? हे कळायला मार्ग नाही.
ओरिजनल प्रोसिडिंगमध्ये खोडतोड
राका येथील ग्राम पंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या घरकुल यादीत चक्क ओरिजिनल प्रोसिडींगमध्ये खोडतोड करून नवी नावे चढविण्यात आली आहेत. ऐवढेच नाही तर, ज्यांची लग्नच २०१७ मध्ये झाली आहेत. त्यांची नावे २०१६ च्या यादीत दाखविण्यात आली आहेत. तेव्हा प्रोसिडींगमध्ये खोडतोड करणारा कोण? असा सवाल आता निर्माण झाला असून सबंधितावर केव्हा कार्यवाही होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.