दुभाजकावर पाणी घालून पाणीटंचाईत पाण्याची नासाडी

0
13

गोंदिया,दि.6 – मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच गोंदिया शहराला सुध्दा पिण्याच्या प्रश्न भेडसावत असून 90 किमीवरील पुजारीटोला धरणातून गोंदिया शहरासाठी डार्गोंली घाटावर पाणी पोचविण्यात आले.शहरामधील संजयनगर,छोटागोंदिया भागात पाणीटचांई शहरामध्ये पाण्यासाठी जनता नळयोजनेवर अवलंबून असताना शहरातीलच जयस्तंभ चौकाकडून मनोहरचौकाकडे जाणार्या रस्त्यावरील दुभाजकावर झाडे नसतानाही त्या दुभाजकावर टॅंकरद्वारे पाणीघालून नासाडी करण्याचा प्रकार सद्या पालिकेच्यावतीने गेल्या दोनतीन दिवसापासून सातत्याने सुरु करण्यात आला आहे.एकीकडे पाण्यासाठी जनता तहानलेली असताना झाडे नसलेल्या दुभाजकावर पाणी घालणे म्हणजे नासाडीच नव्हे काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.त्यातही आजच्या घडीला जिल्ह्यात फक्त 9 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिलेला आहे.