रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतला, राष्ट्रवादीला धक्का

0
12

लातूर,दि.7- भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले रमेश कराड यांनी आपला विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज आज सोमवारी दुपारी मागे घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्रवादीपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. तर दुसरीकडे परभणीमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश नागरे यांनी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला पण वेळ संपल्याने त्यांना अर्ज मागे घेता आला नाही. राष्ट्रवादीने कराड यांना विधान परिषदेचे तिकीट दिल्याने कराड यांनी 2 मे रोजी प्रवेश केला. यानंतर सकाळी ११ वाजता त्यांनी अापली उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. पण आता कराड यांनी माघार घेतल्याने अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.धनंजय मुंडे यांनी खेळलेल्या या खेळीने पंकजा मुंडे गटाला माेठा धक्का बसल्याचे मानले जात होते. पण काही दिवसांतच धनंजय यांची खेळी त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे. कराड यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.