आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय-नाना पटोले

0
22

अर्जुनी-मोरगाव,दि.-7ः  परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा समाज अन्यायच सहन करीत आहे. लढा लढतच आहे. पण शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे प्रतिपादन माजी खासदार  यांनी केले.
कुंभिटोला-बाराभाटी येथे हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सामुहिक विवाह सोहळ््याचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अमरावतीचे इंजि. बी.टी. राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बी.के. गावराने, माजी आ. रामरतन राऊत, मीना राऊत, डॉ. नामदेव किरसान, श्रावण राणा, डॉ. देवकुमार राऊत, गिरीश पालीवाल, तहसीलदार सी.आर. भंडारी, राजेश नंदागवळी, शेषराव कोरेटी, मनोहर चंद्रिकापुरे, अजय कोठेवार, किशन मानकर, वाय.सी. भोयर, प्रशांत भस्मे, लक्ष्मीकांत धानगाये, किशोर तरोणे, सुरेखा नाईक, पद्मा राठोड, महेंद्र जुगणाके, रत्नदीप दहिवले, अनिल दहिवले, करूणा नांदगावे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २० वर्ष आहे. कुंभिटोला-बाराभाटी येथील हलबा-हलबी समाज संघटनेच्या शाखेने सदर सोहळ्याचे आयोजन करून २० वर्षांपासूनची ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, वैवाहिक सोयीसुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. २७ जोडपी परिणयबद्ध झाली
पुढे बोलताना पटोले यांनी, शासनाने योजना काढल्या, पण रितसर राबविल्या नाही. सामाजिक न्याय व सलोखा राखण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केले. पण तो अधिकार, तो न्याय कधीच आदीवासी समाजाला मिळत नाही. हीच परिस्थिती देशासह राज्यात आहे. अनेक विभागात भ्रष्टाचार सुरू आहेत, पण शासनाचे लक्ष नाही, असे सांगीतले.
तसेच या वेळी ना. राजकुमार बडोले, चंद्रिकापुरे, दहिवले, श्रावण राणा, राजेश नंदागवळी, गिरीश पालीवाल, रामरतन राऊत, डॉ. नामदेव किरसान, सहेषराम कोरेटी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तानेश ताराम यांनी मांडले. संचालन करून आभार मोहन औरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुलाराम मारगाये, श्यामलाल चर्जे, नरहरी ताराम, रामू औरासे, वासुदेव औरासे, लिलाधर ताराम, हरिभाऊ नाईक, बब्बू भंडारी, मोहन नाईक, प्रधान यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.