विज वितरण कंपनीच्या अधिकार्यानी केली आचारसहिंता भंग

0
12

गोंदिया,दि.7ःःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसहिंता लागू झालेली असतानाही महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंत्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी 4 मे रोजी राज्याचे ऊर्जामंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गोंदियातील खासगी हाॅटेलात आयोजित पत्रपरिषदेला उपस्थित राहून निवडणुक आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन केले आहे.आचारसहिंता असताना अधिकारी वर्ग हा त्या काळात त्यांच्या विभागातील मंत्री जरी आले तरी त्यांच्या सेवेत राहू शकत नाही असे असताना गोंदियातील पत्रपरिषदेत मात्र विज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित राहून पत्रपरिषदेत ऊर्जामंत्र्यांना हवी असलेली माहिती उपलब्ध करुन देत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.यावरुन सरकारातील मंत्री आपल्या विभागातील अधिकार्यांनाच आचारसंहिता भंग करण्यासाठी प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र असल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे जिल्हा निवडणुक अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार काय अशा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.