बरबसपुरा येथे अग्नितांडव चार घरे जळून खाक : कोट्यावधीचे नुकसान

0
6

गोंदिया,दि. ७ :तालुक्यातील बरबसपुरा येथे अचानक आग लागून ११ शेतकèयांची घरे जळून खाक झाली. ही घटना रविवारी (ता. ६) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. यात सुमारे १ कोटी ३१ लाख ६६ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सायंकाळी गावातील नागपुरे कुटुंबात लग्न समारंभ होते. त्यामुळे ŸŸथानqसग लिल्हारे यांचे १४ लाख ४७ हजार, दिनदयाल लिल्हारे यांचे ९ लाख १० हजार, भोजराज नागपुरे यांचे ५ लाख २३ हजार, तुळशीदास नागपुरे २ लाख ९० हजार, सदाराम नागपुरे यांचे २२ लाख ९० हजार,बाबुलाल नागपूर ११ लाख ८५ हजार,शोभेलाल नागपूर ११ लाख ६० हजार,टोमेंद्र नागपूरे २० लाख ३० हजार चौवाबाई नागपूर २ लाख ९० हजार,परमेश्वरी माहुले ७ लाख ८७ हजार आदींचे १ कोटी ३१ लाख ६६ हजार रुपयाचे नुकसान या आगीत झाल्याचा प्राथमिक अहवाल चुलोद येथील तलाठने तहसिलदार गोंदिया यांना सोपविला आहे.
हे कुटुंबासह लग्न समारंभाकरीता बाहेर गेले होते. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास या घरांना अचानक आग लागली. गावकèयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, हवा सुरू असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही.ही घरे एकमेकांना लागून असल्यामुळे क्षणार्धात आगीत जळून खाक झाले. या आगीत पीडित शेतकèयांच्या घरातील शेतीची अवजारे, कपडे, अन्नधान्य व दागिने तसेच रोख रक्कम जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र चव्हाण, मंडळ निरीक्षक तिवारी, तलाठी डेकाटे, ग्रामसेवक ठाकरे, मेश्राम तसेच पोलिस व अग्निशमन यंत्रणेने तातडीने घटनास्थळावर पोचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकèयांचे यात मोठे नुकसान झाले असून, त्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी गावकèयांनी केली आहे.या सर्व कुटुंबाचे घर जळाल्याने यांना गावातील प्राथमिक शाळेत आश्रय देण्यात आले असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.प्राथमिक स्वरुपात प्रत्येक कुटुंबाला सध्या ६० हजाराची आर्थिक मदत तातडीने आपत्ती निवारण निधीतंर्गत करण्यात आली आहे.