ओबीसी सेवा संघाचे मुख्यमंत्र्याना निवेदन,लिंगेवरील हल्ल्याचा निषेध

0
19

भंडारा,दि.८ः ओबीसी व सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव qलगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघाने निषेध नोंदवून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सोलापूर येथे शुक्रवारी मराठा आरक्षणाबाबत सुनावनी घेण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव qलगे हे आयोगासमोर निवेदन देण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांना निवेदन देण्यास मज्जाव करुन त्यांच्यावर शाई फेकून कपडे फाडण्यात आले. या घटनेचा ओबीसी महासंघातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या कृत्याचा निषेध करीत ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यापुढे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे घेण्यात येणाèया सुनावनी दरम्यान सर्व ओबीसी निवेदनधारकांना व ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकाèयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देणाèया शिष्टमंडळात भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ अध्यक्ष गोपाल सेलोकर,तुळशीराम बंोद्रे,भैय्याजी लांबट,मनोज बोरकर,अनतराम झंझाड आदी उपस्थित होते.