मुख्य बातम्या:

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे

गोंदिया,दि.8 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण? याबद्दलही उत्सुकता  होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल, विजय शिवणकर, मधुकर कुकडे, सुनील फुंडे यांची नावे चर्चेत होती. परंतु पटेल व पटोले यांनी कुकडे यांना झुकते माप देत 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाचे चित्र आजच्या उमेदवारीने स्पष्ट केले आहे.ही निवडणुक राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे बघता फक्त औपचारिकताच राहणार आहे.

विजय शिवणकर व सुनिल फुंडे जर उमेदवार राहिले असते तर भाजपला ही निवडणुक अडचणीची ठरली असती त्याचा विचार भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वरच्यापातळीवर केल्याची चर्चा आहे.तर पटोलेंना या माध्यमातून पटकनी देण्यात आली आहे.कारण राष्ट्रवादी ही जागा जिंकण्याची शक्यताच सध्याच्या घडीला राहिलेली नसून प्रफुल पटेलांनी पटोलेंना शांत करीत भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याने नाना पटोलेंचेही वजन असेच कमी झाले आहे.
Share