राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार बदलणार?

0
19

गोंदिया,दि.9 : नामांकन दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असून भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.त्यातच मंगळवारला राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केल्याचे वृत्त प्रसारीत झाले.त्या वृत्ताला कुकडे यांनी दुजोराही दिला होता.परंतु त्यानंतर अचानक राष्ट्रवादीने भूमिका घेत मुंबई येथे प्रफुल पटेलांनी उमेदवाराची घोषणा झाली नसून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सातारा येथे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमदेवराच्या नावाची घोषणा करणार अशी माहिती प्रसारमाध्यमाना दिल्याने राष्ट्रवादी आपला उमेदवार बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून  खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांनी निवडणुक लढवावी अशा आग्रह नाना पटोले व काँग्रेसने केला आहे.त्यांच्यासोबत  गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे नाव सुध्दा चर्चे आहे.आता या तीन नावापैकी कुठल्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस करते त्याकडे लक्ष लागले आहे.

ही निवडणुक भाजपला सोपी जाऊ नये यासाठी रणनिती तयार करण्यात येत आहे.असे असले तरी भाजपने आधीच रणनितीनुसार प्रत्येक प.स.व जि.प.मतदारसंघात राष्ट्रीय स्वयसेंवक संघाचे कार्यकर्ते जिल्हयातील भाजप नेते व कार्यकर्त्यावर नजर ठेवण्यासाठी पाठविल्याची चर्चा आहे.आज भाजपचे उमेदवार हेमंत पटले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दोन्ही जिल्हयात 1000 चारचाकी वाहनांची व्यवस्था कार्यकर्ते पदाधिकारी यांना भंडारा येथे नेण्यासाठी केल्याचे बोलले जात असून 10 कोटी रुपये खर्चाचे नियोजन या निवडणुकीसाठी भाजपने केल्याची चर्चा आहे. तर या निवडणुकीत शिवसेना सुध्दा रिगंणात उतरणार असून भंडारा जिल्हाध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले हे संभाव्य उमेदवाराच्या यादीत आहेत.शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे,गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे या पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार लढविण्याच्या तयारीत दिसून येत आहेत.उध्दव ठाकरे यांनी तर विशेष लक्ष या निवडणुकीत घातले आहे.