स्कारपिओ दुचाकीची समोरासमोर धडक : दोन ठार ; एक गंभीर

0
13

चामोर्शी,दि.09- एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाºया स्कारपिओ व  मोटारसायकलची समोरासमोरा धडक होऊन झालेल्या अपघतात दोनजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी- वाघधरा मार्गावर घडली. यादव नागोजी शिंदे (३२) रा. निमडरटोला, मोहन नागोजी शिंदे रा. निमडरटोला असे मृतकाची तर रूपेश राऊत असे गंभीर जखमीचे नाव आहे. माहितीनुसार मोटारसायकलस्वार यादव, मोहन, रूपेश हे तिघेजण वाघधरावरून चामोर्शीकडे येत होते.तर स्कारपिओ वाहन हे चामोर्शीवरून बोरीकडे जात होते. दरम्यान दोघांचीही समोर धडक होऊन दुचाकीवरील यादव शिंदे याचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर मोहन शिंदे यांचा गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर रूपेश राऊत हा गंभीर जखमी झाला.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्कारपिओ चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून चालकाला गाडीसह ताब्यात घेतले आहे. धनराज दिगांबर वन्नेवार रा. रामसागर (३६) असे स्कारपिओ चालकाचे नाव असून  पोलिस ठाण्यात भादंवी कलम ३०४(अ), ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४ (अ), १८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मल्हार थोरात, पोहवा दुलाल मंडल, सुनिल हजार करीत आहेत.