डांगुर्ली पाणीपुरवठा योजनेचे आटले पाणी

0
9
शहरवासींना पाणीटंचाईची भीती : उपाययोजना करण्याची ‘ागणी
गोंदिया,दि.9  : शहराला भेडसावणाèया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.मात्र, पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पातळी कमी झाल्याने भविष्यात शहराला पाणीपुरवठा करणारी योजना बंद राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.११ मे पर्यंत पुरेल एवढा सुध्दा साठा उपलब्ध नसल्याने पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता मडके यांनी दिली आहे.
यावर्षी पाऊस क‘ी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर स्वरूपात निर्‘ाण झाली आहे. यातच शहराला पाणीपुरवठा करणारी डांगुर्ली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहराची लोकसंख्या सव्वा लाखांच्या घरात आहे तर, शहरात एकूण चौदा हजार नळ कनेक्शन आहेत. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्याकरिता याच योजनेवर अवलंबून राहावे लागते. पाण्याची क‘तरता लक्षात घेता पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाणी सोडताना आंभोèयाजवळ कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. त्या‘ुळे पुजारीटोला धरणातून पाणी सोडणे तत्काळ बंद करण्यात आले होते. डांगुर्ली येथे सोडण्यात येणारे पाणी काही काळ बंद करण्यात आले होते. त्या‘ुळे गोंदिया शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून फुटलेला कालवा दुरुस्तीचे का‘ जलसंपदा विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात आले. नंतर पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू राहिली. मे महिन्याची सुरवात होताच उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ‘ोठ्या प्रमाणात होत आहे. पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे.