गोरेगाव बाजार समितीमध्ये चालतेय अवैध वसुली

0
19

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यातील गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या काही वर्षातील व्यवहाराकडे बघितल्यास कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करुन बाजार समितीला नफ्यात आणण्याएैवजी लुट करण्याचा प्रकारच संचालक मंडळाच्यावतीने चाललाय की काय अशा प्रकार समोर येऊ लागला आहे.सध्या कार्यरत असलेले भारतीय जनता पक्षाचे संचालक मंडळ बहुमताने सत्तेवर असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भष्ट्राचारमुक्त वातावरणाची गोष्ट करीत असतानाच त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असलेल्या गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र जनावरे विकण्यासाठी आलेल्या शेतकरी व व्यापारीवर्गाकडून मोठ्याप्रमाणात लूट करुन आर्थिक घोळ केला जात असल्याची तक्रार काही शेतकèयानी केली आहे.
ज्याठिकाणी १ टक्का रक्कम वसुल करायची आहे त्याठिकाणी २ टक्के तर जिथे ५ टक्के घ्यायचे तिथे १० टक्के वसुल करुन एकप्रकारे लुटमारीचा प्रकार या बाजार समितीत सुरु असतानाही बाजार समितीचे पारदर्शक सभापती,उपसभापती व संचालक मंडळ गप्प का बसले अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे या बाजारसमितीमधून व्यापारी मोठ्याप्रमाणात कटाईकरीता जनावरे विकत घेत असून दुपारी ३ नंतर ट्रकच्या रांगाच रांगा बघावयास मिळतात.कटाईसाठी ही जनावरे बाजारसमितीतून चंद्रपूर,गोंदिया,गोरेगाव येथील काही व्यापारी खरेदी करुन ट्रकद्वारे आंध्रप्रदेशात पाठवित असल्याची माहिती सुत्रांनी दिली.ट्रकमधून ही जनावरे दिवसाढवळ्या नेण्याची प्रकिया सुरु होऊन रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असताना गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांना हे कसे दिसत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.सोबत.गोरेगाव,डुग्गीपार,नवेगावबांध,अर्जुनी मोरगाव या जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हे ट्रक जनावरांची वाहतूक करीत असताना कसे दिसून येत नाही हा प्रश्न सुध्दा उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे ही जनावरे ट्रकमधून वाहतुक होत असताना राज्यसिमेवर त्या जनावरांची तपासणी होणे आवश्यक असताना गोरेगाव येथील पशुसंवर्धन विभागाच्या एक वैद्यकिय अधिकारी या बाजार समितीमध्ये जाऊन प्रती जनावर ३० रुपये प्रमाणे कुठलीही तपासणी न करताच त्या जनावराला वाहतुक करण्यायोग्य असल्याचे फिटनेस प्रमाणपत्र बाजारसमितीच्या संगनमताने देत असल्याची चर्चा समोर आली आहे.बुधवारच्या बाजार वसुलीतून अवैधरित्या होणाèया रकमेमध्ये संचालकाचा सुध्दा सहभाग असल्याची चर्चा आता बाजारातील शेतकरी व व्यापारी सुध्दा करु लागले आहेत.