नामनिर्देशनाच्या सातव्या दिवशी ११ पक्षांनी घेतले २४ अर्ज

0
19

भंडारा, दि. ९ : भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ७ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात हेंमत पटले भाजपा-२ अर्ज, संजय केवट अपक्ष, मडावी लटारी कवडू अपक्ष, राजेश पुरुषोत्तम बोरकर अपक्ष-३, चनिराम लक्ष्मण मेश्राम-२ अपक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्ष, देवराज हरिश्चंद्र बावणकर शिवसेना आणि डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. तसेच आज ११ पक्षांनी २४ नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे. नामनिदेशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख १० मे, २०१८ पर्यंत आहे.
यामध्ये जितेंद्र आडकुजी राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष-२, मधुकर यशवंतराव कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-३, नाना जयराम पंचबुध्दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-३, विजय महादेवराव शिवनकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-३, रमेश जिवलंग खोब्रागडे अपक्ष-१, काशिराम जगण गजबे अपक्ष-२, संजय गजानन केवट अपक्ष-२, चैतनदास मुकुंदा भैरम अपक्ष-१, झामसिंग फगलाल बघेले काँग्रेस-२, गुणवंत सुदामराव देवपारे भारीप बहुजन महासंघ-३, सेवकभाऊ निर्धनजी वाघाये काँग्रेस-२ यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी च्या वतीने बुधवारी हेमंत पटले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी हजारो भाजप समर्थकांसह हेमंत पटले यांनी भंडारा मधील जलाराम मंगल कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयत पर्यंत भव्य रॅली काढली. हेमंत पटले यांनी १९८० मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. १९९० ते १९९५  त्यांनी पक्षाच्या विधानसभा क्षेत्र आणि १९९५ ते १९९९ लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रभारी म्हणून जवाबदारी पार पाडली. १९९७ ते १९९९ पर्यंत ते महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहिले.२००१ ते २००४ पर्यन्त जिल्हा परिषद सदस्य, २००४ मध्ये त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांवमधून भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली आणि जिंकले ही. २०१० मध्ये पक्षा तर्फे त्यांची गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.