मुख्य बातम्या:

कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस आघाडीचे उमेदवार कुकडे 10 मे रोजी करणार नामांकन दाखल

गोंदिया/भंडारा,दि.09ः-काॅंग्रेस – राष्ट्रवादी कांग्रेस चे अधीकृत उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे हे उद्या 10 में गुरुवार ला सकाळी 11 वाजता जलाराम मंगल कार्यालय, भंडारा येथून रैलीने नामांकन दाखल करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत.कुकडे यांच्या नावावर आज भंडारा येथे झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या सयुंक्त बैठकीत शिक्कामोर्तंब करण्यात आले.तसेच कुकडे यांच्या प्रचारासाठी प्रफुल पटेल व नाना पटोले यांच्या सयुंक्त प्रचार सभा मतदारसंघात करण्याचे जाहीर करण्यात आले.उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी कांँग्रेस चे नेते खासदार प्रफुल पटेल,माजी खासदार व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार बंडूभाऊ सावरबाँधे, नाना पंचबुधे,विलासराव शृंगारपवार,दिलीप बंसोड,राजेंद्र जैन,सेवक वाघाये,आनंदराव वंजारी, भरतभाऊ बहेकर,अनिल बावनकर,रामरतन राउत,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर,भंडारा जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे,गोंदिया जि.प.अध्यक्ष सीमा मड़ावी, प्रेमसागर गणवीर, मधुकर कुकड़े,पुरषोत्तम कटरे,विनोद हरिनखेड़े व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व काॅंग्रेस – राष्ट्रवादी काॅ्ग्रेरस पदाधिकारी कार्यकर्ते यांना उपस्थित  राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापुर्वी झालेल्या सयुंक्त सभेला राष्टवादी कांग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल व काँग्रेसचे नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले.याबैठकीला दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.नरेश माहेश्वरी,धनंजय दलाल,सुनील फुंडे, आमदार प्रकाश गजभिये,जिया पटेल,पी. जी. कटरे,मनोहर चन्द्रिकापुरे, के.आर. शेन्डे, सीमाताई भूरे, वसंतराव हुमने, बशिरभाई पटेल,नामदेव किरसान,मधुभाऊ सांबरे,रमेश तराम,महेश जैन,राजेश नंदागवली,रत्नदीप दहिवले यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Share