सी-६०, सीआरपीएफच्या उत्कृष्ट कामगिरीने पोलीस दलाची मान उंचावली

0
4

गडचिरोली,दि.09 – गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व  २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकीत सी-६० व सीआरपीएफच्या जीवानांनी उत्कृ ष्ट कामगिरी बजावत ४० नक्षलवाद्यांना कंठस्रान घालण्यास यशस्वी झाले असून या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिस दलाची मांन उंचावली आहे. असे प्रतिपादन पोलिस महासंचालक सतिश माथुर यांनी केले. तसेच यापुढे देखली अधीश सातत्यपूर्ण कामगिरी करून गडचिरोली पोलिस दलाचे नावलौकीक मिळवावा यासाठी शुभेच्छा दिल्या. आज पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते गडचिरोली पोलिस मुख्यालयात ४० नक्षल्यांना कंठस्रान घालणात यशस्वी झालेल्या जवानांचे कौतूक करत उत्कृष्ट कामगिरी करणाºया जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलिस महासंचालक (नक्षल विरोधी अभियान) डी. कनकरत्म, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) शरद शेलार, पोलिस उप महानिरीक्षक अंकूश शिंदे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.