मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल# #भंडारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत सोनकुसरे

इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

पणजी: इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्सवर (इव्हीएम)भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा माजी केंद्रीय अथर्मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. दोनापावला येथील इंटरनेशनल सेंटरमध्ये बोलताना त्यांनी देशात अघोषित आणिबाणी लागू  करण्यात आल्याचे सांगितले.

सिटिझन्स फॉर डेमॉक्रोसी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर कडक टीका केली. इव्हीएमवर भरवसा ठेवणे कठीण असून इव्हीएमचे मत आणि लोकांचे मत हे सारखे असेलच हे सांगता येत नाही. काही ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणीत ९ इव्हीएमद्वारे करण्यात आलेल्या मतदानात १० पैकी ८ मते ही भाजपच्या बाजूने झाली होती असे त्यांनी सांगितले. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा आपला आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचा आर्थिक विकास हा खुंटला गेला आहे. सरकारकडून चुकीचे आकडे दाखविले जात आहेत. २०१४ साली दाखविण्यात आलेला ४.५ हा विकास दर चुकीचा असून तो ६.५ एवढा होता. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून तो चुकीच्या पद्धतीने चुकीचा दर दाखविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परीषद घेऊनही देशातील लोक सावध होत नसेल तर ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

Share