मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #सर्पदंशाने मृत पावलेल्या मुलाला बरा करण्याची आयुर्वेदिक डॉक्टारांची हमी ?# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल

शिष्यवृत्तीची उचल करून संस्थाचालक बेपत्ता

चंद्रपूर,दि.10ःवरोरा येथील आनंदवन चौकातील किरायाच्या घरात नसिर्ंग महाविद्यालय उघडण्यात आले. दोन वर्ष नसिर्ंग महाविद्यालय व्यवस्थित सुरू होते. महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने चिमूर प्रकल्प कार्यालयातून तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्तीची उचल केली. त्यानंतर मात्र महाविद्यालय बंद करण्यात आले. संस्थाचालक सध्या नॉट रिचेबल असल्याने उचल केलेल्या शिष्यवृत्तीच्या वसुलीकरिता आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत.
मागील काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नवीन व नाविन्य पूर्ण अभ्यासक्रम घेऊन महाविद्यालयाचे पीक आले होते. त्यात वरोरा शहरही मागे राहिले नाही. आनंदवन चौकानजिक किरायाच्या घरात प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ नसिर्ंग एज्युकेशन या दोन वर्षीय अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. काही वर्ष नसिर्ंग कॉलेज सुरळित सुरू होते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वरोरा शहरातील आरोग्य शिबिरात आपले योगदानही देत होते. महाविद्यालयावर दिवसागणिक विश्‍वास वाढत गेला. येथे शिकणार्‍या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांचा कलही वाढला.
चिमूर येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाने तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्ती महाविद्यालयाला विद्यार्थिनींना वाटप करण्याकरिता दिली. त्यानंतर मात्र महाविद्यालय अचानकपणे बेपत्ता झाले. संस्थाचालकाचा पत्ता नसून संचालक मंडळाचे सदस्यही चिमूर कार्यालयाला दिसेनासे झाले आहेत. भ्रमणध्वनी बंद आहे तर काही नॉट रिचेबल असल्याने शिष्यवृत्ती वसुली कशी करावी, असा मोठा प्रश्न ठाकला आहे. महाविद्यालय व संचालक मंडळाच्या सदस्यांना शोधण्याकरिता चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी मागावर आहेत.

Share