मुख्य बातम्या:
स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ# #ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात # #अखेर सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलावर अंत्यसंस्कार......# #मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन# #तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा# #भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे# #शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे# #मतदार नोंदणीमध्ये महाविद्यालयांचा सक्रीय सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा# #‘नाबार्ड’द्वारा बचत गटातील महिलांना नेतृत्व विकास प्रशिक्षण# #ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या घरी

मुंबई ,दि.11- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे लवकरच पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याची चर्चा सध्या सुरू आहे. छगन भुजबळ गुरुवारीच रुग्णालयातून मुंबईतील घरी आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी सिलव्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळत नसल्याचे त्यांना दीर्घ काळ तुरुंगात राहावे लागले. मात्र गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण मान्य करत कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतरही जवळपास दोन दिवस छगन भुजबळ हे उपचारासाठी रुग्णालयातच होते. गुरुवारी डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याच्या अटीवर रुग्णालयातून सुटी दिली होती. त्यामुळे काही दिवस छगन भुजबळ हे विश्रांती घेणार असे वाटत होते. मात्र भुजबळांनी शुक्रवारी सकाळीच शरद पवारांची भेट घेतल्याने, ते आता लवकरच पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेशी ऋणानुबंध आजही कायम आहेत – भुजबळ

 शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध आहेत. माझ्या पडत्या काळात शिवसेना चांगले बोलल्याचे समाधान आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान, भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्यानं घरी सोडण्यात आले. भुजबळ स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त आहेत. राजकारणात सक्रिय होण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तब्येत सुधारल्यानंतर लोकांमध्ये जाईन आणि 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त हल्लाबोल यात्रेला नक्की जाईन.
Share