मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

इसापुर धरणाचे पानी उजव्या कालव्याद्वारे टेलपर्यंत पोहोचवा

नांदेड,दि.११,ः-हदगाव हिमायतनगर तालुक्यात सध्या पाणी टंचाई तिव्र आहे. नागरिकांच्या व जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभिर असुन पाण्याअभावी नागरीकाचे व जनावरांचे प्रंचड हाल होत अाहे.पाणीप्रश्न सूटावा यासाठी इसापुर धरनाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे कयाधु नदी,नाल्याना 8 द.घ.मी.पाणी सोडावे असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी कार्यकारी अंभियता यांना दिले आहे.कालव्यातून 8 द.घ.मी.सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे याची दक्षता,काळजी कार्यकारी अभियंता यांनी घ्यावी अशी मागनी कार्यकारी अंभियता नांदेड यांच्याकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष,कृषिनिष्ठ शेतकरी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
सध्या तापमानमध्ये प्रंचड वाढ झाल्यामुळे नदी,बोरवेअल,विहीर यांच्यातील पाणीसाठा वेगाने आटत चालला आहे.पाणी टंचाईमुळे नागरिकांना व जनावराना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे,पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इसापुर धरनाचे पाणी 8 द.घ.मी  उजव्या कालव्यातून हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील नदी,नाल्याना सोडण्यात येणार आहे. यामुळे  नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा त्वरीत प्रश्न सुटेल.मागच्या वेळी पाणी सोडले त्यावेळी दोन ठिकाणी कालवा फुटला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते.त्यामुळे पाणी शेवटच्या टोका पर्यंत पोहोचल नव्हते.बरेचसे गाव पाण्यावाचुन वंचित राहिले होते.यावेळी यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कार्यकारी अभियंता यांनी दक्षता घ्यावी अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
Share