मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

देहव्यापार अड्डय़ावर पोलिसांची धाड

भंडारा,दि.12ः- खातरोडवरील खोकरला येथे भाड्याच्या घरात देहव्यापार करणार्‍या चार महिलांसह एका इसमाला गुरुवारी (ता.१0) ४.३0 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अटक केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी पथकांसह खोकरला शिवारात सुरूअसलेल्या देहव्यापाराचे ठिकाणी अत्यंत शिताफीने सापळा रचून धाड घातली. यावेळी भाड्याच्या घरात एक ४२ वर्षीय महिला मुलींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करतांनी मिळून आली. सदर ठिकाणी देहविक्री करण्याचे उद्देशाने ४ महिला तसेच एक ईसम आढळून आले. महीला व ईसमाविरुध्द भंडारा पोलिसांनी कलम ३, ४, ५ (क), स्त्रियांचा अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ अन्वये गुन्हा नोंद केला असून ४ महीलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पोटे तसेच पोलिस हवालदार वामन ठाकरे, सुधीर मडामे, पोलिस नायक रोशन गजभिये, पोलिस शिपाई वैभव चामट, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, योगीता जांगळे, चालक पोलिस हवालदार रामटेके यांनी केली.

Share