मुख्य बातम्या:

बोदलबोडीच्या उपसरपंचाविरुध्द पोलीसात तक्रार

सालेकसा,दि.12ः- तालुक्यातील ग्राम पंचायत बोदलबोडीचे माजी सरपंचाचे इमारत बांधकाम घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच या ग्रामपंचायतीचे उपसरंपच एका नवीन वादात सापडले आहेत. ग्राम पंचायत उपसरपंच नारायण गेडाम ह्यांच्या विरोधात गावातील महिलांनी अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस ठाणे सालेकसा येथे केली आहे. लेखी तक्रारीवरून उपसरपंच ह्यांच्यावर कलम 506 आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नारायण गेडाम हे राहणार भाडीपार येथील असून तक्रारकर्ता महिला सुद्धा भाडीपार राहवासी अाहेत.गेडाम यांनी दारूच्या नशेत गावातील चौकात ग्राम पंचायत महिला सदस्य आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या महिलांना संबोधून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलीसांनी  अजूनही कुठलीही कारवाई न केल्याने साटेलोटे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ग्राम पंचायत अधिनियम अनुसार बोदलबोडी ग्राम पंचायतीत एकूण 8 सदस्यांपैकी 5 महिला असून तीन पुरुष सदस्य अाहेत.लोकशाहीत पुरुषांच्या तुलनेत महिलांना समान हक्क मिळाले पण पुरुप्रधान देशात आजही महिलांना ते स्थान मिळताना या घटनेतून दिसत नाही आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपीवर 294 आणि 506 कलम लावून तपास सुरू असल्याची माहिती सालेकसाचे ठाणेदार मोहन खंदारे यांनी दिली आहे.
Share