जिओचा पोस्टपेड प्लॅन, ‘एवढ्या’ रुपयात मिळणार महिनाभर फ्री कॉल

0
13

मुंबई(वृत्तसंस्था),दि.12-  रिलायन्स जिओच्याकडून डेटा प्लॅन्सवर, कॉलिंग सेवेवर मिळणारी घसघशीत सूट नेहमीच चर्चेत असते. अनेक जण जिओच्या विविध सेवांचा पर्याय निवडताना दिसत आहेत. प्रीपेड सेवेनंतर आता रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवा सुरू केली आहे. त्यामुळे दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी मोबाइल रिचार्च करायला कंटाळा येणाऱ्यांसाठी पोस्टपेड सेवा उत्तम पर्याय ठरु शकतो. रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवा सुरू केल्यावर ग्राहकांसाठी अतिशय कमी दरात बिलिंग सेवा दिली आहे. 15 मे पासून जिओच्या या पोस्टपेड सेवेचं सबस्क्रिप्शन सुरू होणार असून त्याला ‘जीरो टच’ असं नाव देण्यात आलं आहे.

जिओ पोस्टपेड ग्राहकांना 199 रुपये प्रति महिन्यात अनलिमिटेड कॉलिंग व डेटा सर्व्हिस देते आहे. याशिवाय अनलिमिटेड लोकल, नॅशनल, रोमिंग आऊच गोइंग कॉल, दिवसाला 100 फ्री एसएमएस, व 25 जीबी 4 जी डेटा मिळणार आहे. सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना प्रिमियम जिओ अॅपचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे.पोस्टपेड सेवेमध्ये ग्राहकांना प्री-अॅक्टिवेटेड आयएसडी सुविधाही मिळणार आहे. कुठलंही सिक्युरिटी डिपॉझिट न भरता ग्राहकांना ही सुविधा मिळेल.

 असं करा जिओ पोस्टपेड अॅक्टिव्हेट
जिओ व नॉन जिओ दोन्ही प्रकारचे ग्राहक जिओ पोस्टपेड वापरू शकतात. 15 मे नंतर ही सेवा सुरू होईल. त्यासाठी युजरला जिओच्या वेबसाइटवर जाऊन जिओ पोस्टपेड सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. याशिवाय जिओ स्टोअर किंवा कस्टमर केअरमार्फत जिओ पोस्टपेड सर्व्हिस घेता येईल.