मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

२२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

सोलापूर ,दि.१४ः-: निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवर
येताच ‘टीस’ समिती नव्याने नेमून सर्वेक्षण करायला लावून जखमेवर मीठ चोळले़ महाराष्ट्राच्या इतिहासात धनगर समाजाइतकी कोणत्याच समाजाची फसवणूक झाली नाही़
या सरकारने समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे़ या विरोधात २२ मे रोजी मंत्रालयावर राज्यभरातील समाजबांधवांना घेऊन ऐतिहासिक ढोल गर्जना मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़.
शेंडगे म्हणाले, १९५६ साली नेमलेल्या समितीने सर्वेक्षण करुन धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबसाठी असलेल्या( एस़टी़ ) आरक्षणानुसार सवलती देण्याची शिफारस केंद्राकडे केली होती़ त्यानंतर राज्य सरकारने या समाजाचा शेड्यूल ट्राईबमध्ये समावेशही केला़.मात्र ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ हा उल्लेख केला गेला आणि ४ पिढ्या उद्ध्वस्त झाल्या़ ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहे, याबाबतचे असंख्य पुरावे विधानसभेत दिले गेले तरी याची फारशी कुणी दखल घेतली नाही़ २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर-बारामती पदयात्रा काढून आंदोलन केले तसेच ९ दिवस उपोषण करुनही लक्ष वेधले़ हे उपोषण सोडवायला आलेले तत्कालीन भाजपा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आलो की पहिल्याच कॅबिनेट बैठकीत विषय घेऊन अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत ग्वाही दिली़.आतापर्यंत जवळपास २२५ कॅबिनेट बैठका झाल्या़ पण एकदाही हा विषय त्यांनी हाती घेतला नाही़ हे सरकार झोपेचे सोंग घेतले असले तरी ढोल वाजवून त्याला जागे करणार आहोत़

Share