उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज दिवस;शिवसेनाप्रमुख पटलेंची हकालपट्टी?

0
14

गोंदिया/पालघर, दि. 14- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, उद्या (दि. 14) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भाजपचे हेमंतकुमार पटले यांच्यासह 24 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. निवडणुकीत शिवसेना व बसपचा उमेदवार नसला, तरी विदर्भ माझा व भारिप-बहुजन महासंघाने उमेदवार दिल्याने चुरस वाढण्याची शक्‍यता आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची संधी असल्याने त्यानंतर उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. 24 पैकी किती उमेदवार रिंगणात राहणार याबाबत मतदारांची उत्सुकता वाढलेली आहे.

पालघर या मतदारसंघात जरी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असते तरी त्यापैैकी प्रमुख उमेदवार रिंगणातच राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा, काँग्रेसतर्फे दामू शिंगडा, भाजपातर्फे राजेंद्र गावीत, बविआतर्फे बळीराम जाधव आणि डाव्या पक्षांतर्फे किरण गेहला असे उमेदवार रिंगणात आहेत. अन्य उमेदवार हे अपक्ष कि ंवा चिल्लर पक्षांचे आहेत त्यामुळे अंतीम लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव, गेहला यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत.डाव्या पक्षांचा उमेदवार या मतदारसंघात विजयी होत नसला तरी तो मोठी मते खाऊन जया पराजयाचे पारडे झुकविण्यास कारणीभूत ठरत असतो हा इतिहास आहे. हे ध्यानी घेता लढत वनगा, शिंगडा, गावीत, जाधव अशी चौरंगी होण्याची शक्यता आहे. राष्टÑवादीने या निवडणूकीत उमेदवार उभा केलेला नाही तो काँग्रेसला पाठिंबा देईल अशीच शक्यता आहे. श्रमजीवीने आपली भूमिका अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाही ती जाहीर झाल्यानंतर तिचाही परिणाम मतदानावर बऱ्याचअंशी होऊ शकतो. कडेगाव पलुसमध्ये आम्ही उमेदवार उभा केलेला नाही, हे लक्षात घ्या व पालघरमधून उमेदवार मागे घेऊन भंडारा गोंदियात पाठिंबा घ्या, असा प्रस्ताव शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे. त्याचाही फैसला सोमवारी होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पटलेंची हकालपट्टी?

गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी रविवरला गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख  यांच्यासोबत झालेल्या कार्यकर्ता बैठकित भंडारा जिल्हा शिवसेनाप्रमुख इंजि.राजेंद्र पटले यांना पक्षातून काढण्यात आल्याचे वक्तव्य केले.त्यानुसार उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे यांनी पटले यांची हकालपट्टी झाल्याचा निरोप काही प्रसारमाध्यमांना दिला.त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क करुन वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसेनेचे सर्वच नेते टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले.शेवटी धुमाळ यांना विचारणा केल्यावर अशी काहीही प्रकिया नाही ते सदस्य आहेत हे सांगत मोरघडेना अशा प्रसार करु नये असे सांगतो असे म्हणून वेळ मारुन नेण्याच्या प्रयत्न केला असला तरी धुमाळ यांच्या बोलण्यातील हालचालीवरुन पटले यांची हकालपट्टी झालेली असून निवडणुक काळात मतभेद नको आणि ओबीसीमध्ये मोठ्या ंसख्येने असलेल्या पोवार समाजाला नाराज करणे कठीण जाईल या भितीनेच त्यांनी हकालपट्टी झालेली नसल्याचे सारवासारव करण्यास सुरवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.