मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

बुलढाणा जिल्ह्यात १० किलो गांजा जप्त

बुलढाणा,दि.14ः- जिल्ह्यात रविवारला आरोपिकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे केली.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहीतीवरून मलकापूर येथून मुंबई येथे गांजा नेत असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडून १० किलो गांजा जप्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात याप्रकरणी राजू रामलाल श्रेष्ठ (वय 30, रा. बेलापूर, जि. ठाणे) या गांजा नेणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ३ हजार ४८० रुपये किंमतीचा १० किलो गांजा जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली गोपनीय माहिती वरून मलकापूर येथुन एक युवक गांजा घेऊन मुंबईला जात असल्याची माहीती मिळताच रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सॅगमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या राजू रामलाल श्रेष्ठ यास पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस अधिक्षक प्रताप शिकारे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे, विकास पानझोडे, रघुनाथ जाधव यांनी केली.

Share