मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल# #भंडारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत सोनकुसरे

200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !

मुंबई,दि.14 -नोटाबंदी लागू झाल्यानंतर आरबीआयकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण, तुमच्याजवळ  असलेल्या 200 किंवा 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही कारणामुळे जर खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय, बँकांमध्ये जमादेखील करता येणार नाही येत.

कारण, चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यामुळे फाटलेल्या, खराब अवस्थेत असलेल्या 200 व 2000 रुपयांचा नोटा तुमच्याकडे असतील तर वेळीच सावध व्हा. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणं ( नोट एक्सचेंज), जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतो. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा एक भाग आहे. या कायद्यामध्ये 5, 10, 50, 100, 500 रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र 200 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा यात उल्लेखच नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयनं या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले नाहीत. यामुळे 200 किंवा 2000 नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलतादेखील येणार नाहीयेत.

 8 नोव्हेंबर 2016मध्ये नोटाबंदी नियम लागू झाल्यानंतर 2,000 रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली यानंतर 200 रुपयांची नोट ऑगस्ट 2017मध्ये वापरात आली. आरबीआयनं आता 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. बँकर्संकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन सीरिजमध्ये फाटलेल्या-खराब झालेल्या नोटांचं प्रमाण कमी आहे. मात्र आरबीआयच्या नियमांमध्ये बदल केले गेले नाहीत तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
Share