मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #सर्पदंशाने मृत पावलेल्या मुलाला बरा करण्याची आयुर्वेदिक डॉक्टारांची हमी ?# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल

नागपुरात विद्यार्थिनीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार

नागपूर दि. १४ :-: रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने पायी घरी जात असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचे दोघांनी दुचाकीवर बळजरीने बसवून अपहरण केले. तिला एका पडक्‍या घरात नेऊन दोरीने हातपाय बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार केला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली असता कुणीही धावून आले नाही. पहाटेच्या सुमारास युवतीने आरोपींच्या तावडीतून पळ काढून पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अनोळखी दोन युवकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पीडित 18 वर्षीय युवती वृषाली (बदलेले नाव) ही जरीपटक्‍यातील धम्मज्योतीनगरात राहते. बारावीची परीक्षा संपल्यामुळे तिने ब्युटी पार्लरचे क्‍लासेस लावले होते. शनिवारी सायंकाळी ती घरून पायी क्‍लासला गेली. परंतु, क्‍लासला सुटी असल्यामुळे ती मैत्रिणीकडे जाण्यास निघाली. रात्री आठ वाजता निर्जन रस्त्यावर एकट्या युवतीला पाहून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तिला हटकले. तिने मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगितले. रस्त्याने मदतीसाठी कुणीही नसल्याचे पाहताच तिला दुचाकीने सोडून देऊ का? अशी विचारणा केली? वृषालीने मात्र नकार देऊन चालायला लागली. त्यानंतर तिच्याशी आरोपींनी अश्‍लिल चाळे करणे सुरू केले. तिला बळजबरीने दुचाकीवर ओढून अपहरण केले. तिला कामठी नाका क्रमांक 2 जवळील एका कोपऱ्यात असलेल्या पडक्‍या घरात नेले. तेथे तिचे दोरीने हातपाय बांधले तर तोंडात रूमाल कोंबला. त्यानंतर दोघांनीही दारू प्यायली. आरोपींनी रात्रभर सामूहिक बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. पहाटेच्या सुमारास आरोपी झोपल्याचे पाहून युवतीने तेथून पळ काढला. तिने थेट जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना हकीकत सांगितली. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी दोन युवकांविरूद्ध सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Share