भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक १८ उमेदवार रिंगणात

0
13

ङ्घ मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत

गोंदिया,दि.१४ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वैद्य २४ उमेदवारांपैकी आज ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे उपस्थित होते.
राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत पक्षाचे उमेदवार मधुकरराव कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह घडयाळ, हेमंतकुमार श्रावण पटले भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ, राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत पक्षाव्यतिरिक्त नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार अक्षय योगेश पांडे विदर्भ माझा पार्टी चिन्ह दूरदर्शन, गोपाल तुकाराम उईके गोंडवाना गणतंत्र पार्टी चिन्ह करवत, डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे डॉ. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया चिन्ह कोट, जितेंद्र आडकू राऊत अखील भारतीय मानवता पक्ष चिन्ह पेनाची निब सात किरणांसह, धर्मराज रामचंद्र भलावी बहुजन मुक्ती पार्टी चिन्ह खाट, नंदलाल दिक्षीत काडगाये बळीराजा पार्टी चिन्ह नारळाची बाग, बोरकर राजेश पुरुषोत्तम बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी चिन्ह गॅस सिलेंडर, मडावी लटारी कवडू भारीप बहुजन महासंघ चिन्ह कपबशी, अजाबलाल तुलाराम अपक्ष चिन्ह फळांची टोपली, किशोर मनोहर पंचभाई अपक्ष चिन्ह ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गजबे काशिराम जगन अपक्ष चिन्ह बॅट, चनिराम लक्ष्मण मेश्राम अपक्ष चिन्ह नांगर चालविणारा शेतकरी, पुरुषोत्तम नारायणराव कांबळे अपक्ष चिन्ह मेनबत्ती, राकेश टेंभरे अपक्ष चिन्ह हिरा, रामविलास शोभेलाल मस्करे अपक्ष चिन्ह बासरी व सुहास अनिल फुंडे अपक्ष चिन्ह अंगठी हे उमेदवार रिंगणात आहेत.
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार जागृती मोहिम राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी विशेष अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीत प्रथमच व्हिव्हिपॅटचा वापर होणार असून या मशिन विषयी नागरिकांना माहिती व्हावी म्हणून महत्वाचे चौक, बाजाराचे ठिकाणी व अन्य ठिकाणी व्हिव्हिपॅटचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात येणार असल्याचे श्री. काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.