मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

आरोग्य विभागातील मोबाईल चोर मद्यपी कर्मचाऱ्याच्या उत्पात

गोंदिया,दि.15 : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एका मद्यपी व मोबाईल चोर कर्मचाऱ्याच्या त्रासाने सर्वच कर्मचारी कमालीचे दहशतीत आले असून महिला कर्मचारी शासकीय कार्यालयातच सुरक्षित नसल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे.शासकीय कार्यालयामध्ये लाखो रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमरे लागल्यानंतरही कर्मचार्यांच्या वर्तनात सुधारणा दिसून येत नाही.सदर आरोग्य विभागाचा कर्मचारी आधी आमगाव तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. सदर कर्मचारी हा नेहमीच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर असतो त्यातही कधीही येणे व जाणे सुरुच असते.आपल्या सोबत काही कर्मचार्यानाही त्यांनी व्यसनी बनविल्याची चर्चा आहे.आपल्याच कार्यालयातील एका महिला कर्मचार्याच्या पर्समधून मोबाईल चोरल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने या मद्यपी कर्मचार्याचे बिंग फुटले आहे.या घटनेला 15 दिवसाचा काळ लोटूनही अद्यापही त्याच्यावर न झालेली कारवाई  महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरली आहे.

आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाºयाचा १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरत असल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही बाब कैद झाली आहे. याबाबत  अर्ज केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीचा प्रकार व सीसीटीव्ही फुटेजबाबत सदर कर्मचाऱ्याला कळवून मोबाईलची मागणी करण्यात आली. परंतु सीसीटीव्ही फुटेजच खोटे असल्याचे सांगून हा कर्मचारी थेट सुट्ट्यांवर निघून गेला.

Share