मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरिक्षण करा- खर्च निरिक्षक प्रभात दंडोतिया

 खर्चाचा दररोज अहवाल पाठवा
 बँकेचे स्टेटमेंट तपासा
 समारंभ व जेवणावळीवर नजर ठेवा
गोंदिया,दि.१५ : लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार निश्चित झाले असून निवडणूकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अतिमहत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा उमेदवार वस्तुस्थितीदर्शक खर्च नमूद करीत नाहीत. त्यामुळे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकाऱ्यांनी उमेदवार व पक्षाच्या खर्चावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षक प्रभात दंडोतिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज लोकसभा निवडणूक खर्चाशी संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, कोषागार अधिकारी अमित मेश्राम व सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
लोकसभा पोटनिवडणूकीच्या संबंधाने पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च याची १८ मे, २२ मे व २६ मे रोजी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च अहवाल तपासणी दिनांकाच्या एक दिवस अगोदरपर्यंत निवडणूक खर्च नोंदवहीत नोंदविण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिल्या. खर्चाशी संबंधित सर्व अहवाल दररोज निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावे. उमेदवारांचे वाहन, सभा व प्रचार कार्य आदीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व रेकॉर्डींगमधील बाबी तपासून खर्च मान्य करण्यात यावा.
स्टॉटिक सर्व्हेलन्स टिम मार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरिक्षक व आयकर खात्याला दयावे व त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सभास्थळी येणाऱ्या वाहनांची रेकॉर्डींग करतांना प्रत्येक वाहनाची नंबरप्लेटसह रेकॉर्डींग करणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील बँकांमधून मोठया प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. निवडणूक काळात उमेदवारांनी आपल्या खात्यातून काढलेल्या रकमेचा तपशिल सादर करावा,असेही त्यांनी सांगितले.
केवळ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर विश्वास न ठेवता सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांनी आपल्या वैयक्तिक यंत्रणेमार्फत खर्चाची पडताळणी करावी. निवडणूक खर्च निरिक्षक यांचेशी कायम संपर्क ठेवून काही अडचण आल्यास प्रभात दंडोतिया निवडणूक खर्च निरिक्षक यांचेशी ७६२०६२५५८७ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. राजकीय पक्ष व उमेदवार यांचे खर्चाचे खाते वेगवेगळे असून खर्च नोंदणी करतांना वेगवेगळी नोंदणी करावी, असे निर्देश दंडोतिया यांनी दिले. निवडणूक काळात होणाऱ्या जेवणावळी व राजकीय पक्ष किंवा उमेदवार उपस्थित असलेले लग्न समारंभ यावर लक्ष्य ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Share