मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन २७ मे रोजी

पुणे,दि.15 : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (दि. २७) प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) जवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. युवक आघाडीचे महासचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हा युवती अध्यक्ष प्रियदर्शिनी निकाळजे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षण, कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका, सुक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार बेकार भत्ता, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारक अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

 

Share