मुख्य बातम्या:

स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

नागपूर,दि.15 : सदरमध्ये सलून-स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. अल्पावधीत मोठी रक्कम हाती पडत असल्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला-मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली
राहुल मदनलाल गुप्ता (वय ३४, रा. एमआयटी ले-आऊट, उमरेड रोड)आणि अजय मुरलीधर शर्मा (वय ३२, रा. मानकापूर) अशी सेक्स रॅकेट चालविणारांची नावे आहेत. त्यांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेच्या बाजूला हेवन सलून स्पा सुरू केले होते. महिला-मुलींकडून मसाज करवून घेण्याच्या नावाखाली ते येथे वेश्याव्यवसाय करवून घ्यायचे. मोठी रक्कम मोजणाऱ्या ग्राहकांना ते पाहिजे तेथे देहविक्रय करणाऱ्या महिला-मुली उपलब्ध करून द्यायचे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत पोलीस नायक संजय प्रभूदास पांडे यांना या रॅकेटची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर शहानिशा करून घेण्यात आली. येथे कुंटणखाना चालत असल्याची खात्री पटल्यानंतर कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पोलिसांनी पाठविलेले बनावट ग्राहक गुप्ता आणि शर्माच्या स्पा मध्ये पोहचले. त्यांनी देहविक्रय करणाऱ्या महिला-मुलींची मागणी करताच गुप्ता-शर्माच्या जोडगोळीने त्यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघी जणी उपलब्ध करून दिल्या. ठरल्याप्रमाणे काही वेळातच पोलीस पथक आतमध्ये धडकले. त्यांनी तीन वारांगनांसोबत गुप्ता-शर्माला ताब्यात घेतले.

Share