मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबाला विरोधी पक्ष नेते पाटील यांची १ लाखाची आर्थिक मदत

नांदेड:,दि.17 (प्रतिनिधी) ः-सावळेश्वर  येथिल शेतकरी माधवराव रावते यांनी मागील माहिन्यात स्वतःचे सरण रचुन आत्महत्या केली होती. आत्महत्या ग्रस्त शेतकरी  कुटुंबाला महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सात्वनपर भेट देवून १ लाखाचा धनादेश दिला. धनादेश जमा होण्यास बॅक कडुन विलंब होत असल्यामुळे शेतकरी कुटुंबास विखे पाटील यांचे वतीने भागवत देवसरकर यांनी १ लाखाची रोख रक्कम त्यांची पत्नी व मुलगा यांच्यीकडे सुपुर्द केली .
सावळेश्वर ता.उमरखेड येथील अल्पभुधारक शेतकरी माधव रावते याने स्वताच्या शेतात भर दुपारी १ वाजता चा दरम्यान स्वताच सरण रचुन १४ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती या घटनेमुळे परिसरासह सुपुर्ण महाराष्ट्रमध्ये खळबळ माजली होती.याचीच दखल घेत महाराष्ट्राचे विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 3० एफ्रील रोजी सावळेश्वर ला प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी कुटुबांची सात्वनपर भेट घेवुन कुंटुबास आर्थिक मदत म्हणुन विखे पाटील यांनी १ लाखाचा धनादेस तात्काळ दिला होता.दरम्यानच्या काळात शेतकऱ्याच्या वारसा चे कुठल्या हि बँकेत खाते नसल्यामुळे धनादेश वटण्यास विलंब लागत होता हि बाब विखे पाटील यांना माहीत होताच त्यानी त्याचे प्रतिनिधी डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांना तात्काळ पाठवुन १ लाखाची रोख रक्कम आत्महत्या केलेल्या शेतकरी यांची पत्नी अनुसया रावते व मुलगा गंगाधर रावते यांचे कडे सुपुर्द केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष गुणवत सुर्यवंशी,कृषि परिषदेचे राज्य संघटक चक्रधर देवसरकर,संदिप पावडे,परमेश्वर काळे,सुनिल ताकतोडे,परमेश्वर रावते,सिध्दु पोपुलवार,दिनेश रावते यांचे सह परिवारातील इतर सदस्य व गावकरी हजर होते
॥अनुसयाबाई ला अश्रु अनावर॥
आत्महत्या शेतकरी माधवराव रावते यांच घरी १ लाख रूपयाची रोख रक्कम घेवुन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे खास दुत भागवत देवसरकर हे गेले असता त्यांना हि रक्कम देताना अनुसयाबाई यांना आश्रु आनावर झाले त्यावेळी उपस्थीता सह सर्वाच्या डोळ्यात पाणी तरळले सर्व जनच भावनाविवश झाले होते.
Share