मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

अखेर राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

 भंडारा,दि.17 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी प्रवेश केला. यावेळी भाजपचे विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर, विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके उपस्थित होते. पटले यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा रविवारपासून होती. परंतु तेव्हापासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबद्दल ठामपणे सांगता येत नव्हते. दरम्यान, मंगळवारला त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी राजेंद्र पटले हे ईच्छूक होते. परंतु शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज पटलेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते.
Share