कंत्राटी तांत्रिक अधिकारी लाच मागितल्याप्रकरण ताब्यात

0
14

तिरोडा,दि.17-येथील पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी तांत्रीक अधिकारी ओमप्रकाश सुखराम कटरे यांना आज ३ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.फिर्यादी सरांडी येथील रहिवासी असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचा गोठा बांधकामासाठी निधी मंजुर झाला होता.त्या गोठयाचे बांधकामही पुर्ण झाले होते.त्या बांधकामाचे १ लाख ३ हजार २५० रुपयाचे बिल शासनाकडून मिळणे बाकी होते.ते बिल गोठ्याची पाहणी केल्यानंतर मंजुर करण्याकरीता कंत्राटी तांत्रिक अधिकारी कटरे यांनी ५ हजाराची मागणी केली.परंतु तक्रारदारास द्यायची ईच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारी चौकशी करण्यात आली असता आरोपीने पैशाची मागणी केल्याची आढळून आल्याने आज तिरोडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले.